घटना निर्मितीचे प्रयत्न

Foundation of Indian Constitution for MPSC UPSC exam. ( घटना निर्मितीचे प्रयत्न ) : स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या घटना निर्मितीसाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले.

 

Foundation of Indian Constitution for MPSC UPSC (घटना निर्मितीचे प्रयत्न) :भारतीय घटनेच्या निर्मितीची पूर्वपिठीका (घटना निर्मितीच्या प्रक्रियेचा क्रम ) 

 

१९२२ महात्मा गांधीजीनी यंग इंडिया मध्ये संविधानसभा हा शब्दोउल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली.
१९२४ मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळात भारतासाठी एक संविधान असावे अशी मागणी केली.
१९२७ काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेस कार्यकारणींने भारतासाठी संविधान आराखडा तयार करावा अशी मागणी केली.
१९२८ मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या घटनेची मूलभूत तत्वे निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात अली. हा भारताच्या घटना निर्मिती करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न होता.
डिसेंबर १९२९ लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठराव संमत करण्यात आला.
१९३३ पंडित जवाहरलाल नेहरूनी सर्व प्रथम प्रातिनिधिक घटना समितीची मागणी केली.
१९४० लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट घोषणेद्वारे भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हि मागणी मान्य करण्यात अली.
१९४२ सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या क्रिप्स योजनेमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हि मागणी मान्य करण्यात अली.
१९४६ मे १९४६ मध्ये त्रिमंत्री योजनेद्वारे (कॅबिनेट मिशन प्लॅन) घटना निर्मितीची पद्धत ठरली.

राज्यघटना प्रस्तावना इथे वाचा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.